कोपरगाव वीज वितरण कार्यालयावर महिलांचा मोर्चा

0
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) –शहरातील वीज वितरण कंपनीने पाठविलेल्या वीजबिलात प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा जादा बिले आल्याने संतापाची लाट उसळली आहे. कालच्या तक्रारनिवारण दिनी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने वीज मंडळावर मोर्चा नेण्यात आला व अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला. अधिकार्‍यांच्या उत्तराने महिलांचे समाधान न झाल्याने पुन्हा आक्रमक मोर्चा आणण्याचा इशारा त्यांनी दिला.
नगरसेविका सौ. सपना मोरे, शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सौ. विमल पुंडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर नेण्यात आला. कंपनीतर्फे तक्रार निवारण दिनानिमित्त ग्राहकांच्या तक्रारी घेणे चालू असताना महिलांचा मोर्चा येऊन धडकला. यावेळी सपना मोरे म्हणाल्या, शहरात अनेक नागरिकांना वापरापेक्षा जास्त विजेची बिले आली आहेत. आधीच मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांना जादा जास्तीच्या बिलाचा भुर्दंड पडत आहेत. यामध्ये केवळ वीज कर्मचार्‍यंाची चूक आहे त्यांत सुधारणा करा.

विमल पुंडे म्हणाल्या, आमच्या भागात बर्‍याच ग्राहकांना विजेची भरमसाट बिले आली आहे प्रत्यक्षात विजेचा वापर कमी मात्र बिले जास्त असा प्रकार आहे. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी यात सुधारणा न केल्यांस कंपनीवर मोठा मोर्चा आणू असा इशारा यावेळी त्यांनी दिला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन म्हणाले बिले जास्त आल्याच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही त्याची पडताळणी केली असता मागच्या एजन्सीने वीज मिटरवरील रीडिंग न बघताच मोघम आकडे कार्यालयास दिले आता एजन्सी बदलली आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकाचा फोन नंबर घेतला असून या फोनवर तुम्हाला किती रीडिंगचे बिल आले हे कळविले जाईल. प्रत्येक नागरिकाने याबाबत सतर्क रहावे असे आवाहन त्यांनी केले. मोर्चात महिला कार्यकर्त्या सौ. सुमित्रा महाजन, मोनाली आघाडे, दीपाली धनगे, धनश्री देवरे आदींसह असंख्य महिला सामील झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

*