नाशिक जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय; पेरणीयोग्य स्थिती

0

नाशिक, ता. २४ : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी (२२ जूनला) आगमन झालेला मोसमी पाऊस आज शहरासह सर्व ठिकाणी सक्रिय झाला असून जुलै महिन्यात चांगल्या पावसाचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.

आजचा पाऊस पुढील दोन दिवस सुरू राहिला, तर शेतातील ढेकळे फुटतील आणि चांगला वाफसा आल्याने बळीराजा पेरणी करून शकेल.

हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे म्हणाले की यापूर्वीचा पाऊस थांबून येत असल्याने पेरणीसाठी योग्य नव्हता.

मात्र आता मोसमी पाऊस सक्रिय झाल्याने एक दोन दिवसात पेरणीयोग्य स्थिती येऊ शकते. ज्या परिसरातील शेतातील ढेकळे या पावसाने फुटली असतील, तेथील शेतकऱ्यांनी योग्य स्थितीचा अंदाज घेऊन पेरणी करण्यास हरकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यंदा जिल्हयात  जूनच्या सुरवातीला झालेला जोरदार पूर्वहंगामी पाऊस आणि आता आलेल्या पावसामुळे खरीपासाठी योग्य वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

*