कळसुबाई शिखरावर मान्सूनचं आगमन

0
संगमनेर (प्रतिनिधी)- मान्सून महाराष्ट्रात सगळीकडे हळुहळु अग्रेसर होतोय. कोकणातून आता मान्सुनने मध्य महाराष्ट्राकडे आगेकुच करायला सुरुवात केली आहे. कोकण आणि इतर मध्य महाराष्ट्राच्या दरम्यान सह्याद्रीच्या उचंच उंच रांगा उभ्या आहेत. रविवारी मान्सुनचं आगमन महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईच्या शिखरावर झालयं…
हिमालयाप्रमाणे सह्याद्रीच्या कळसुबाई शिखर मान्सूनच्या ढगांनी पूर्ण अच्छादीत झाले आहे. कळसुबाई परिसरातील उडदावणे, घाटघर, पांजरे परिसरात रविवारी ढगांनी चादर पसरली. मान्सूनची अतुरतेने वाट पाहणार्‍या निसर्ग प्रेमी व शेतकर्‍यांना आनंद देणार्‍या मान्सूनने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावरुन सिमोल्लंघन केले. या पहिल्या मान्सूनच्या ढगांचे छायाचित्र संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी टिपले आहे.

LEAVE A REPLY

*