गारगाई नदीवरील पुल मोजतोय शेवटच्या घटका

0
मोखाडा (माधुरी आहेर) | मोखाडा तालुक्यातील खोडाळ्याहुन इगतपुरी, घोटी आदी बाजारपेठा व कसारा या महत्वाच्या रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३७ चा गारगाई नदीवरील पुल जिर्ण झाला असून पुलाच्या वरच्या बाजुच्या संरक्षक भिंतींचा कठडा तुटलेला असल्याने अपघातांना निमंत्रण मिळाले आहे.

या परिसरातील यामुळे भविष्यातील अशा अपघाताची वाट न बघता ठोस उपाययोजना का केल्या जात नाही अशी विचारणा परिसरातील नागरिक करीत आहेत.

हा पुल ब्रिटीशकालीन बांधकाम वास्तुचा एक उत्तम नमुणा असुन तो आजच्या घडीला शेवटची घटका मोजत आहे. कारण यामार्गावरुन दररोज हजारो प्रवाशी व वाहनांची वर्दळ असल्याने दुर्देवी दुर्घटना होण्याची भिती वाहन चालक व प्रवाशी वर्गाकडुन व्यक्त केली जात आहे.

गारगाई नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजुने १५० ते २०० फुट खोल दरी असुन या पुलावरील रस्त्यावर व दीड दोन किलो मीटर पर्यंतच्या रस्त्यावर १ फुट खोल तर ३ ते ४ फुट रुंद असे खड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे रस्त्यावर डांबरीकरणाएेवजी खड्डेच खड्डे पहावयास मिळतात.

LEAVE A REPLY

*