बुध्दिमानच खरा धनवान : पिचड

0

राजुर (प्रतिनिधी) – पैसा हा तुमच्या मागे येतो तो तुमच्याकडे असलेल्या बुद्धी कौशल्यानेच त्यामुळे जो बुध्दिमान तोच खरा धनवान असे प्रतिपादन वैभवराव पिचड यांनी केले.

जागतिक आदिवासी दिना निमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर आयोजित कार्यक्रमात आ.पिचड बोलत होते. यावेळी आदिवासी विभागाच्या सल्लागार सिराज बन्साला, आदिवासी सेवक बाबा खरात, मंगलदास भवारी, जयराम इदे, सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी.एन.कानवडे, राजूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब देशमुख, सि.डी.पी.ओ.गांगुर्डे, उपसरपंच गोकुळ कानकाटे, अरुण माळवे, शेखर वालझाडे, नंदुबाबा चोथवे, प्राचार्य लेंडे, निलेश साकुरे यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार वैभवराव पिचड होते. प्रास्ताविक प्रकल्पाधिकारी संतोष ठुबे होते.

पिचड म्हणाले की,आदिवासी समाजाने आपली संस्कृती जपली पाहिजे. जल, जंगल, जमीन या संपत्तीवर आपला अधिकार आहे. यामुळेच वनहक्क व पेसा कायदा करण्यात आला आहे. त्यासाठी पिचड साहेबांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आपण पर्यावरण संतूलन कसे राखायचे हे जगाला शिकविले. त्यामुळे वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. आदिवासी विभागाच्या सल्लागार सिराज बन्साला यांनी मनोगत व्यक्त केले.आभार राठोड यांनी मानले.

LEAVE A REPLY

*