Thursday, April 25, 2024
Homeनगरनियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरे जा

नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरे जा

अकोले |प्रतिनिधी| Akole

ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांचे समवेत पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांमुळे अकोले तालुका काँगेस पक्षामध्ये आता चैतन्य निर्माण झाले आहे.

- Advertisement -

राज्यात काँगेसची ताकद नामदार बाळासाहेब थोरात यांचे मुळे वाढत असून नियोजनबद्ध पध्दतीने आगामी अकोले नगरपंचायत निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

आगामी अकोले नगरपंचायत निवडणूक निमित्ताने येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजत असताना अकोलेत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सक्षमपणे आपली भूमिका स्पष्ट करत अकोले तालुक्यातील काँगेसला बळकटी देण्यासाठी पूर्वतयारी म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

तसेच तालुक्याचे समाजकारण, राजकारण, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्यासह तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी मुंबईत नुकताच महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या बैठकीत त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मधुकरराव नवले यांनी आपण भाजपच्या व्यासपीठावर न जाता केवळ अपघाताने भाजपच्या सोबत होतो, मात्र मन मात्र पुरोगामी विचारांनी प्रेरित असल्याने अस्वस्थ होते, तसेच आपण श्रद्धेय भाऊसाहेब थोरात विद्यापीठातील मुशीत तयार असल्याने ना. बाळासाहेब थोरात व आ. सुधीर तांबे यांचे विचारांवर श्रध्दा असल्याने स्वगृही आल्याचा सर्वाधिक आनंद झाला आहे.

तर जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी संघटनात्मक बाबी विषद करत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक संदर्भ देत मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. के. बी. हांडे, मिनानाथ पांडे, विलास आरोटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांची समयोचित भाषणे झाली.

यावेळी ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, विक्रम नवले, युवकचे अध्यक्ष अमोल नाईकवाडी, एनएसयुआयचे अध्यक्ष संतोष तिकांडे, भाऊसाहेब नाईकवाडी, रमेश जगताप, भास्कर दराडे, रमेश पवार, एकनाथ सहाणे, अ‍ॅड. जोरवर, मंदाताई नवले, शोभाताई निर्गुडे, अनिल शेटे, बाबासाहेब नाईकवाडी, सचिन जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी आरिफ तांबोळी यांनी पक्षाच्या देशपातळीवर ते स्थानिक पातळीवरील दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चा ठराव मांडला व श्रद्धांजली अर्पण केली.

प्रास्ताविक व स्वागत करताना जिल्हा कमिटीचे सरचिटणीस शिवाजी नेहे यांनी आगामी नगरपंचायत निवडणूक आरक्षण व प्रभागनिहाय नागरिक समस्यांवर भाष्य करत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन सतीश पाचपुते यांनी केले व आभार अ‍ॅड. बी. एम. नवले यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या