राहुरी पालिकेला धरणातून पाणी उचलण्यास मंजुरी : आ. कर्डिले

0

उंबरे (वार्ताहर) – राहुरी नगरपालिकेच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मुळा धरणातून पाणी उचलण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याने योजना मार्गी लागणार असल्याची माहिती आ.शिवाजीराव कर्डिले दिली.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांचेकडून राहुरी नगरपरिषदेला मुळा धरणाच्या जलाशयातून घरगूती वापराच्या प्रयोजनासाठी वाढीव पाणी आरक्षणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्राप्त झाला होता. त्यानुसार 2031 सालची लोकसंख्या विचारात घेऊन पाणी उचलण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. राहुरी नगरपालिकेच्या सुमारे 27 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेला या कारणामुळे गती मिळणार आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून राहुरी नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी आ.कर्डिले शासन दरबारी प्रयत्न करत असून योजनेस मुळा धरणातून पाणी उचलण्यास राज्य शासनाने संमती दर्शविल्याने सदर योजना आता मार्गी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*