राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला जातिय वळण दिल्याने मीरा कुमार नाराज

0

येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे रामनाथ कोविंद यांना उमेद्वारी देण्यात आली आहे.

तर संयुक्त राष्ट्रीय आघाडीकडून मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून दलित उमेदवार दिल्याने.

राष्ट्रपति निवडणुकीला जातीय वळण दिले जात असल्याने, त्याविरोधात मीरा कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या निवडणुकीला जातीचं स्वरुप देणाऱ्यांना त्यांनी चांगलंच ठणकावलं आहे.

जर समाजाला पुढे घेऊन जायच असेल तर जातीला एका गाठोड्यात बांधून जमिनीत पुरायला हवं, असे मीरा कुमार म्हणाल्या.

मीरा कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. गुजरातमधील साबरमती आश्रमातून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ करणार आहेत.

 

LEAVE A REPLY

*