मारुती सुझुकीची इग्निस दोन महिने आधीच लॉन्च होण्याची शक्यता

0
नवी दिल्ली : मारुती सुझुकीची इग्निस कार लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. या कारबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या.

पुढच्या वर्षी ही कार लॉन्च होणार असल्याचे बोलले जात होते मात्र या दोन महीने आधीच ही कार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.

‘इग्निस’चा फर्स्ट लुक फेब्रुवारीत झालेल्या इंडियन ऑटो एक्स्पो-२०१६ मध्ये दाखवण्यात लॉन्च केला होता. या कारची स्पर्धा महिंद्राच्या केयूव्ही-१०० या कारशी असणार आहे.

या कारमध्ये ग्राऊंड क्लियरेन्स, मोठे रिअर विंडशील्ड, आकर्षक डिझाईन आणि प्रोजेक्टर हॅडलँप्ससारखे महत्त्वाचे आणि आधुनिक फीचर्स आहेत. या कारचे फ्रंट डिझाईन अत्यंत आकर्षक असे असून, डे टाईम रनिंग एलईडी लाईट्स, व्हील आर्च आणि बी-पिलरवर ब्लॅक फिनिशिंग आहे.

LEAVE A REPLY

*