नाशिक जिल्ह्यात बाजारसमित्या झाल्या सुरु; शेतमाल दाखल; लिलावास प्रारंभ

0

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला आहे. आज दुपारनंतर लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एक जूनपासून शेतकरी संपावर गेल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बाजारसमित्या ओस पडल्या होत्या. मात्र काल सुकाणू समितीची नाशकात बैठक झाली.

यावेळी आंदोलनाची दिशा ठरली असून यापुढे नागरिकांना वेठीस न धरता येत्या १२ आणि १३ तारखेला याबाबत ठिय्या आणि रेल रोको होणार आहे त्यामुळे आता बाजारसमितीत शेतमाल दाखल होणार आहे.

आज दुपारी नाशिक बाजारसमितीत लिलाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सटाणा बाजार समितीचे कामकाज चालु आहे. बाजार आवारावर फक्त डाळींब या शेतीमालाची सकाळी ९.४४ वाजेपर्यंत पर्यंत साधारण १००० क्रेट्सची आवक झालेली आहे.

कांदा व भुसार मालाची आवक नाही. त्यामुळे आवक आल्यावर लिलाव पूर्ववत होणार असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे.

१२ वाजता नियमित शेतमालाची लिलाव प्रक्रिया पार पडेल. तसेच भाजीपाल्याचे बाजारभाव पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*