‘तू तिथे असावे’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; भूषण प्रधान आणि पल्लवी पाटील मुख्य भूमिकेत

0

‘तू तिथे असावे’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता भुषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटील हे दोघे तू तिथे असावे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत.

या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील आणि दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

भुषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत.

 

LEAVE A REPLY

*