मराठा क्रांती मोर्चाचे विराट दर्शन घडवण्याचा निर्धार

0

नाशिक । 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईत निघणार्‍या मराठा क्रांती मोर्चाचे विराट दर्शन घडवून राज्य शासनाकडे समाजाच्या भावना पोहचविण्याचा निर्धार आज नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला.

शहरातील औरंगाबाद रोड भागातील वरद लक्ष्मी लॉन्स या ठिकाणी आज नाशिक जिल्हा मराठा क्रांती समन्वय समितीची बैठक झाली. यात प्रारंभी जिल्ह्याच्या वतीने मुंबई मोर्चाच्या तयारीसंदर्भातील माहिती उमेश शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाना पुष्पहार अर्पण करुन बैठकीस प्रारंभ झाला.

यात प्रथम दिव्या महाले या बालिकेने उपस्थित समाज बांधवाना भावनिक साद घालतानाच समाजाच्या उद्याच्या भवितव्यासाठी मोर्चात सहभागी होण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. तसेच रसिका शहाणे, काजल गुंजाळ या बालिकेने समाजाच्या व्यथा मांडल्या.

करण गायकर यांनी मोर्चाच्या करण्यात आलेल्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती देताना या ऐतिहासिक मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर सुनील बागुल, उद्धव निमसे, अ‍ॅड. शिवाजी सहाणे, जयंत दिंडे, रमेश धोंगडे, शशिकांत जाधव, अरुण पवार, रत्नाकर चुभळे, शिवा भागवत यांनी शिस्तबध्द मोर्चा नियोजनात केलेल्या व्यवस्थेची माहिती देतानाच आपल्या मागण्या पूर्ण करुन घेण्यासाठी आणि समाज एकजुटीचे विराट दर्शन घडवण्याचे आवाहन केले.

बुधवारी निघणार्‍या मोर्चाच्या मुंबईतील नियोजन व तयारीसाठी उद्या पाच बसेस मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर आजच्या बैठकीत ज्या पाच मुलींनी आपल्या भाषणातून उपस्थितांना भावनिक साद घातली त्यापैकी 2 मुलींना जिल्ह्याच्या वतीने मुंबईत बोलण्याची संधी मिळणार आहे.

ज्या समाज बांधवाचे नातेवाईक व मित्रपरिवार मुंबई व ठाण्यात आहे, त्यांनी आजपासूनच रवाना होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच समाज बांधावांनी खासगी वाहने, बसेस, रेल्वे अशा मिळेल त्या वाहनांनी रवाना व्हावेत, असेही आवाहन करण्यात आले. महामार्गाने मुंबईकडे जाणार्‍या बांधवांना काही ठिकाणी नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली असुन आरोग्य विभागाकडून काही ठिकाणी वैद्यकीय सुविधा देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती यावेळी समन्वय समितीकडून देण्यात आली.

यावेळी गणेश कदम, चंद्रकांत बनकर, सुनील अड़के, संतोष माळोदे , मधुकर कासार, शिवाजी मोरे, शरद तुंगार, तुषार जगताप, किशोर जाचक, हंसराज वाडघुलेे, विकास कानमहाले, माधवी पाटील, अमित जाधव, नवनाथ शिंदे, प्रकाश चव्हाण, अमोल वाज़े, विकास भागवत, संजय फडोळ, महेश आडके, शरद लभड़े, बाळा निगळ, यश बच्छाव, संदीप लभड़े, राज भामरे, मदन कोकाटे, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर कवडे, विलास जाधव, ज्ञानेश्वर जाधव, छाया पाटील, सचिन पाटील, सचिन पवार, अमित नडगे, वैभव इंगळे, रोहिणी दळवी, अनिल गायकवाड़, विक्की धोंडगे, कैलास खांडबहाले, अस्मिता देशमाने, नितीन बोराडे, सुनील भोर आदीसह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*