Maratha Reservation : तोडगा निघणार? CM शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन, काय झाली चर्चा?

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

राज्यात मराठी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे करत असलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मराठा आंदोलनाला कालपासून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक भागात आंदोलकांनी नेत्यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोनवरून जरांगे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात फोनवर तब्बल २४ मिनिटे चर्चा झाली. थोड्या वेळात अभ्यासक बोलावणार आणि चर्चा करून पुन्हा मुख्यमंत्री यांच्याशी जरांगे बोलणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अर्धवट आरक्षण नको, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी केली. जरांगे पाटील हे मराठा अभ्यासकांसोबत च

आज मोठा निर्यण होणार?

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे समितीचा अहवाल मांडून त्याला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या जनभावना आणि राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची काल भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास २० मिनिट चर्चा झाली. राज्यपाल लवकरच मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *