आश्वासन नको निर्णय घ्या, अन्यथा मागे हटणार नाही – आंदोलनकर्ते

0

मुंबई | मराठा मूकमोर्चाचा एल्गार आज मुंबईत धडकला. सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक गच्च भरली होती.

आझाद मैदानावर थांबलेल्या आंदोलनकर्त्यांनी मात्र सरकारचे आश्वासने नको आम्हाला, ठोस निर्णय घ्या अशी भूमिका घेतल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

मोर्चास्थळापासून कुणीही निघत नसून मुख्यमंत्री विधानसभेत निवेदन सादर करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल अशी माहिती संयोजकांकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे.

LEAVE A REPLY

*