मराठा क्रांती मोर्चा : 9 ऑगस्टला मुंबईत

0

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तारीख अखेर ठरली आहे.

येत्या 9 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने आज मुंबईतील सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

सर्व आचारसंहितांचे पालन करून हा महामोर्चा काढला जाईल. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी पहिला मोर्चा निघाला होता. म्हणून मुंबईतील महामोर्चा ९ ऑगस्टला काढणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.
या मोर्चासाठी वातावरणनिर्मिती व्हावी यासाठी ६ जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे निमित्त साधत गावोगावी महामोर्चाची माहिती देण्यासाठी व्यापक अभियान सुरू केले जाणार आहे.
तर १३ जुलैला कोपर्डी येथील क्रांती ज्योतीला श्रद्धांजलि वाहून अभियानाचा आढावा घेतला जाईल.

LEAVE A REPLY

*