मराठा क्रांती मोर्चा : कापडण्यात रॅली

0
कापडणे । दि. 7 । प्रतिनिधी-मुंबई येथे होणार्‍या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर येथे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन करुन मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज मोरे, सरपंच भटु पाटील, उपसरपंच प्रभाकर बोरसे, कापडणे परीसर विकास मंचचे शाम पाटील, भैया पाटील, बंटी पाटिल, अमोल बोरसे, योगेश पाटिल, भुषण शिंदे आदी उपस्थित होते.

कापडण्यासह धमाने, नगाव, बिलाडी, कौठळ, न्याहळोद, तामसवाडी, धनुर आदी परिसरातील गावांमध्ये सदरची मोटारसायकल रॅली काढण्यात आली. घोषणांनी दुमदुमला.

राजमाता जिजाऊ वंदनेने रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी मनोज मोरे यांनी मुंबई मराठा क्रांती मोर्चासंदर्भातल्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. शेवटी आभार अमोल बोरसे यांनी मानलेत.

 

LEAVE A REPLY

*