मराठा क्रांती मोर्चा; 9 ऑगस्टच्या मोर्चाची तयारी पूर्ण

0

नाशिक । दि. 2 प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी आदि विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर चर्चेसाठी समिती जाहीर करण्यात आली आहे. खा. उदयनराजे भोसले , खा. संभाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 210 सदस्यांचा या समितीत सामावेश करण्यात आला आहे.

9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा समाजाच्यावतीने ऑगस्ट क्रांती दिनी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान येथे राज्यव्यापी महामुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकमधुनही मोठया संख्येने समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार असुन नाशिकमध्ये याची तयारी पुर्ण करण्यात आयुन याकरीता समिती गठित करण्यात आल्याचे समितीची सदस्य गणेश कदम आणि करण गायकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर जगभरातील मराठा समाज आपल्या ज्वलंत मागण्यांसाठी एकवटला. आतापर्यंत मराठा क्रांतीने 57 मुकमोर्चे काढले.

मराठा समाजास कायद्यात बसणारे आरक्षण, शेतीमालाला हमीभाव, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी शिक्षा द्यावी यासह 20 मागण्यांना एक वर्षानंतरही सत्ताधारी भाजप सरकारने न्याय दिलेला नाही.

त्यामुळे समाजात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मोर्चाचे नेतृत्व सामुहीक असल्याने चर्चा कुणाशी करणार असा प्रश्न वारंवार उपस्थित करत याच कारणाने सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नाही.

कोल्हापूर येथील मराठा गोलमेज परिषद , अमरावती , मुंबई , नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकांमध्ये याबाबत विचारविनिमय करण्यात आला. सरकारकडे या मागण्यांसदर्भात पाठपुरावा करण्यासाठी यंत्रणा असावी याकरीता सर्वानुमते 17 जुनच्या नाशिक येथील बैठकित शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्यानूसार 210 सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. यात खा. उदयनराजे भोसले आणि खा. संभाजीराजे भोसले यांचे मार्गदर्शन असणार आहे. प्रत्येक जिल्हयातून पाच सदस्यांचा या समितीत सामावेश करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत त्वरीत निर्णायक पाउल उचलावे अन्यथा 9 ऑगस्टच्या मोर्चात सरकारला असंतोषाला सामोेरे जावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी शरद तुंगार , योगेश नाटकर , सोमनाथ जाधव , माधवी पाटील , आशिष हिरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*