मराठा क्रांती मोर्चा : जिल्ह्यातून दोन लाख बांधव सहभागी होणार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्याच्या राजधानीत मुबंई येथे 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी आझाद मैदानावर एक मराठा, लाख मराठा नि:शब्द एल्गार घुमणार असून नगर जिल्ह्यात महामोर्चाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातून दीड ते दोन लाख मराठा बांधव मोर्चात सहभागी होणार असल्याचा समन्वयकांचा अंदाज आहे.
कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर जिल्ह्यानिहाय रस्त्यावर उतरलेला सकल मराठा समाज आता आझाद मैदानावर एकवटणार आहे. 9 ऑगस्टचा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून गावो-गावी प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. त्यासाठी तरुण सोशल मिडीयाचा अधिक वापर करत आहेत. तालुकानिहाय बैठका घेऊन मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
महामोर्चाच्या जागृतीसाठी नगर शहरासह जिल्ह्यात दुचाकी रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यातील गाड्या निघण्याचा वेळ वेगळा ठेवण्यात आला आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार्‍या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शन घडावे. यासाठी मराठा मोर्चा दरम्यान मुंबईत दाखल होताना मराठा बांधवांनी शिस्त व नियम पाळावे यंासंदर्भात आवाहन करण्यात आले.
बार,धाब्यावर मद्यपान करु नये, एक्सप्रेस महामार्ग असल्याने वाहनांची हवा तपासावी, शिविगाळ, अश्‍लील हावभाव, असभ्य घोषणा, कोणत्याही समाजाविरोधात घोषणा देऊन वातावण बिघडू नये, मोर्चाचे नेतृत्व वैयक्तिक कोणी करत नसल्याने एकमेकांना मदत करा, वाहतूक कोंडी झाल्यास पुढाकार घेवून रस्ता मोकळा करण्यास मदत करावी.पोलिस आपलेच सहकारी आहेत.
वाहतूक नियंत्रण कामी त्यांना सहकार्य करावे, महिला व वृध्द व्यक्तींचा मोर्चात लक्षणीय सहभाग राहणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सर्वाची आहे. मोर्चात मौजमजा म्हणून न जाता निषेध करण्यासाठी जात आहोत. रेल्वेने जाताना तिकीट काढूनच प्रवास करावा. तसेच प्रवासादरम्यान स्टंट टाळावे,  अनोळखी वस्तु आढळल्यास पोलिस किंवा स्वयंसेवकांच्या लक्षात आणून द्या.
संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करा, मोर्चात सहभागी होताना प्रत्येकाने दोन दिवस पुरेल एवढे पाणी व जेवन आणावे.मुंबत मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडे राहण्याची सोय करावी.मधुमेह, रक्तदाब किंवा इतर कोणत्याही विकाराने त्रस असल्यास औषधे सोबत ठेवावी.स्व:ताचे ओळखपत्र खिशात ठेवावे.असे आहवान करण्यात आले आहे.
तरुणांचा चलो मुंबईचा नारा – 
गेल्या महिनाभरापासून मोर्चाच्या जनजागृतीच्या पार्श्‍वभुमिवर सकल मराठा समाजातील तरुणांनी फेसबुक, हॉटसपच्या माध्यमातून चलो मुंईचा नारा दिला आहे.आम्ही निघालो तुम्हीपण येणार ना असे घोष वाक्य फिरत आहे.मोर्चा नियोजनाचा व मुंबईतील जिल्हानिहाय पार्किगचा नकाशा जिल्हाभर सोशलमिडीयावर पाहायला मिळत आहे.

तालुकानिहाय गाड्यांचे नियोजन – 
मोर्चाचे नियोजन तालुकास्तरावरुन करण्यात आले आहे. तालुकानिहाय वाहनांची अंदाजे संख्या राहुरी- 150-200 ,नगर शहर व नगर तालुका 150-200, जामखेड-165, कर्जत-225, पाथर्डी-90, शेवगाव-172, नेवासा-85,श्रीगोंदा-91, अकोले-100, पारनेर- 15-200, संगमनेर-152, राहाता-45 तर, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यातील मोर्चात सहभागी होणारे शिर्डी एक्सप्रेसमधून जाणार आहे. तालुकास्तरावर स्टिकर, झेंडे, बॅनरचे स्वयंसेवकांनी नियोजन केले असून वाटप सुरु आहे.

LEAVE A REPLY

*