सकल मराठा समाजाची श्रीरामपुरात बाईक रॅली

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – मुंबई येथे येत्या 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी श्रीरामपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
थत्ते मैदान, बेलापूर रोड, मोरगे वस्ती रोड, संगमनेर रोड, शिवाजी रोड, मेनरोड, नेवासा रोड, साईमंदिर मार्गे कॅनॉल रोडने पुन्हा थत्ते मैदान अशी रॅली काढत नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. मुंबई मोर्चाला हजारो बांधव तालुक्यातून नेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शहरात खरेदी-विक्री संघ, बेलापूर रोड, श्रीरामपूर येथे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
येत्या 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता खरेदी-विक्री संघात तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व बांधवांनी व्यक्तिगत निरोपाची वाट न बघता बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*