राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मंजुषा गुंड

0
अहमदनगर ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाव्दारे दिली .
मंजुषा गुंड यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भूषविले आहे . संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क आहे त्यामुळे पक्षसंघटना वाढीस निश्चितीच फायदा होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.चित्रा वाघ यांचे हस्ते व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधिमंडळ गटनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, जिल्हा प्रभारी दिलीपराव वळसे पाटील आणि पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत लवकरच अधिकृत नियुक्तीपत्र सौ .गुंड यांना दिले जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष घुले पाटील यांनी प्रसिद्दी पत्राव्दारे सांगितले.

LEAVE A REPLY

*