राज्यभरातील दुकाने , मॉल्स, रेस्टॉरंट रात्रभर सुरु राहणार; विधानसभेत विधेयक मंजूर

0

राज्यभरातील हॉटेल, मॉल आणि दुकानं रात्रभर सुरु राहणार आहेत. विधानसभेत या संदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आले.

राज्यभरातील दुकानं, मॉल्स, रेस्टॉरंट रात्रभर सुरु ठेवण्यासाठी, दुकानं आणि आस्थापना कायद्यात बदल करण्यासंबंधीचे विधेयक बुधवारी मध्यरात्री मंजूर करण्यात आले.

मात्र दुकाने, हॉटेल सुरु ठेवण्याबाबत सरकारने काही बंधने घातली आहेत. कोणत्या भागात कोणती दुकानं, आस्थापनं किती वेळ सुरु ठेवायची याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे.

शिवाय जी दुकानं तसंच आस्थापनांमध्ये 50 पेक्षा अधिक महिला काम करतात, तिथे पाळणाघराची व्यवस्था मालकांना करावी लागणार आहे. तर शंभरहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टिनची व्यवस्था करणं बंधनकारक असेल. तसंच महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी घरी सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी आस्थापना मालकांची असेल. तर प्रत्येक आस्थापनेत सीसीटीव्ही लावणं सक्तीचं केलं आहे.

 

LEAVE A REPLY

*