मालेगाव महापालिका निकाल : विद्यमान महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम पराभूत

0

मालेगाव : प्रभाग क्रमांक २० मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झालेले आहेत. तर विद्यमान महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम पराभूत झाल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे.

एमआयएमला मालेगावात चांगले यश मिळाले असून तब्बल अकरा जागांवर निर्णायक आघाडी घेतल्याची माहिती मिळते आहे. शिवसेना दहा जागांवर कायम आहे.

कॉंग्रेस मात्र मोठा पक्ष होण्याच्या तयारीत दिसून येत आहे. कॉंग्रेसला जवळपास ३० जागांवर आघाडी घेता आली आहे. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीदेखील २४ जागांवर आघाडीवर आहे. भाजपच्या तीन जागांवर विजय झाला आहे.


मालेगाव महापालिकेच्या मतमोजणीसाठी दहा वाजता सुरुवात झाली. नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार कॉंग्रेसने निर्नायक मुसंडी घेतली असून तब्बत अकरा जागांवर विजय मिळवला आहे. त्यानंतर शिवसेनाही सात जागांवर विजयी झाली असून राष्ट्रवादीने पाच जागांवर विजय मिळवला आहे.

तर भाजपला याठिकाणी आतापर्यत एका जागेवर विजय मिळवण्यात यश आले आहे.

एकूण 7 ठिकाणी मतमोजणी होत असून परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे.

मतदानाच्या दिवशी गालबोट लागल्यामुळे अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत मोठा फौजफाटा ठिकठिकाणी बंदोस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.

नुकतीच मुख्य निवडणूक निरीक्षकांनी मतमोजणीच्या ठिकाणी भेट देत आढावा घेतला.

LEAVE A REPLY

*