मालेगावात ‘एमआयएम’चे एकाच कुटुंबातील तीन उमेदवार विजयी

0
मालेगाव : एमआयएमने मालेगावात धडाक्यात प्रवेश केला आहे.
महापालिकेचे माजी महापौरपद तसेच उपमहापौरपद भूषवलेल्या इसा कुटुंबातील तीन सदस्य निवडून आले आहेत. तर दोघांचा पराभव झालेला आहे.

एकाच कुटुंबातील, एकाच पक्षाकडून निवडणूक लढतांना तीन सदस्यांचा विजय मालेगावात पहिल्यांदाच झाला आहे. विशेष म्हणजे तिन्ही सदस्य नव्याने स्थापन झालेल्या ओवेसींचा पक्ष ‘एमआयएम’चे आहेत.

माजी उपमहापौर युनुस ईसा यांच्यासह त्यांचे पुत्र डॉ. खालिद परवेज, मजीद हाजी यांचा विजय झाला तर माजी महापौर अब्दुल मलिक आणि सून तसलीन खालिद परवेज यांचा पराभव झाला आहे.

सुरुवातीला एकाच कुटुंबातील पाचही उमेदवारांचा विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र विरोधकांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केल्यानंतर माजी महापौर अब्दुल मलिक आणि तसलीन परवेज यांचा पराभव झाला.

LEAVE A REPLY

*