‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाचे म्युझिक लॉच

नाशिक ।  फ्रेश लूक, दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या धाटणीचे कथासूत्र यामुळे बर्‍याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाचे म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. चित्रपट निर्मात्या रिचा सिन्हा, रवी सिंघ त्याचबरोबर स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, विजय निकम, कमलेश सावंत, मंगल केंकरे, सतीश आळेकर, सीमा देशमुख आणि इतर कलाकार यांच्याबरोबर लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सोहळ्याच्या सुरुवातीलाच ‘तुझ्यासाठी आता असणेही, नसणेही तुझ्यासाठी’ गाण्यावरील गश्मीर-स्पृहाच्या सादरीकरणाने वातावरण गुलाबी केले, त्याला जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी आपला मधुर स्वर दिला होता. अभय जोधपूरकर आणि प्रियांका बर्वे यांचे ‘विरल्या केव्हा हळुवार या भावना’ या चित्रपटातील गाणे प्रियांका बर्वेने सादर केले. सोहळ्याचा शेवट जसराज जोशी आणि श्रुती आठवले यांच्या मधुर आवाजातील मौनातूनी ही वाट चालली पुढे या गाण्याने झाला आणि हा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. चित्रपटात एकूण 4 गाणी असून 28 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*