‘मेक इन नाशिक’ला मिळणार चालना

0

नाशिक । दि. 2 प्रतिनिधी
नाशिकच्या औद्योगिक वाढीस चालना मिळावी याकरीता ‘मेक इन महाराष्ट्र’च्या धर्तीवर ‘मेक इन नाशिक’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत नुकताच मुंबईत मेक इन नाशिकचे सादरीकरण करण्यात आले.

नाशिकमध्ये मोठया उद्योगांनी गुंतवणुक करावी यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिले होते.

त्यानूसार 9 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे नाशिकच्या उद्योजकांना आंमत्रित करण्यात आले आहे. या बैठकिला देशातील 10 मोठया कंपन्यांच्या व्यवस्थापकिय संचालकही उपस्थित राहणार आहे.

मुंबईमध्ये झालेल्या मेक इन नाशिक कार्यक्रमात केंद्रिय मंत्री गिते यांनी नाशिक शहर हे झपाटयाने विकसित होणारे शहर असून औद्योगिक वाढीस येथे पोषक वातावरण असल्याने या शहराला दिशा देणे गरजेचे आहे. त्याअंतर्गत देशपातळीवर अनेक प्रकल्प उभारले जात आहेत.

नाशकातही मोठे प्रकल्प उभारण्याची जबाबदारी माझ्यावर आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नाशिकलाही काही उद्योग सुचवावेत अशी सुचना त्यांनी केली. तुम्ही सांगाल तो उद्योग स्थापन करू असे आश्वासनही त्यांनी दिले.

त्यानूसार खा. हेमंत गोडसे यांनीही यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यानूसार येत्या 9 ऑगस्ट रोजी उद्योग भवन दिल्ली येथे दुपारी 4 वाजता नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंसह निमा व आयमा संघटनांचे पदाधिकारी या बैठकिला उपस्थित राहणार आहेत.

तसेच देशातील 10 कंपन्यांच्या व्यवस्थापकिय संचालकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबई, पुण्यानंतर झपाटयाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिककडे पाहीले जाते.

नाशिकमध्ये दळणवळणाच्या दृष्टीने कनेक्टिव्हिटीही आहे. सर्व पायाभुत सुविधा असुनही गेल्या दहा वर्षात एकही मोठा प्रकल्प नाशिकमध्ये उभा राहू शकलेला नाही. मात्र आता या बैठकिच्या निमित्ताने ‘मेक इन नाशिक’ला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कंपन्यांचा असेल सहभाग
इलेक्ट्रोनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि., भारत अर्थ मुव्हर्स ली., भारत डायनामिक्स ली., भारत इलेक्ट्रोनिक्स ली., गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स ली., गोवा शिपयार्ड ली., हिंदुस्तान एरोनौटीक्स ली., हिंदुस्तान शिपयार्ड ली., माझगाव डौक शिपबिल्डर्स ली. आणि मिश्रा धातू निगम ली.या दहा कंपन्यांचे व्यवस्थापकिय संचालक उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*