मेक इन नाशिकमध्ये १९०० कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

0
मुंबई (रविंद्र केडिया) | दि. ३१ : नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मेक इन नाशिक उपक्रमाद्वारे २९ उदयोगांच्या माध्यमातून १८७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव निमाकडे सादर झाल्याने उदयोग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.
मेक इन नाशिक उपक्रमाच्या माध्यमातून वरळी येथील नेहरू सेंटर येथे दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरिने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळपर्यंत २९ उदयोगसमुहांनी गुंतवणूकीचे प्रस्ताव निमाकडे सादर केले.

यात प्रामुख्याने श्रीवेदा सत्ता प्रा. लि. (५ कोटी रु.), टेक्नोएज (५० कोटी) युरोपन मेटल सेंट्रल लि. (२७० कोटी), सुला विनयार्ड (१०० कोटी), सु-टेक इंजिनिअर्स प्रा. लि.( ६० कोटी), ई एस डी एम टेक्नॉलॉजी प्रा.लि. (११कोटी), जिंदाल सॉ.ली. (२५० कोटी), धनश्री कॉम्पलेक्स प्रा.ल (५ कोटी), इंडस्ट्रियल पॉलिमर्स (५ कोटी), एमएलटी पॅक सर्विस (३ कोटी), रेक्टीफेज कॅपॅसिटर्स (१.५ कोटी), होल्डन मेडिकल लॅबरोटरी प्रा.लि. ( ४० कोटी), स्वस्तिक पल्प ॲन्ड पेपर्स प्रा.लि. (३० कोटी), भगवती फेरो मेटल प्रा.लि. (१०० कोटी), प्रमोद फायबर प्लास्ट प्रा.लि. (१४कोटी), डेल्टा स्पिन्टेक्स प्रा.लि. (१०० कोटी), नाशिक ॲग्रीकल्चर फुड इंडस्ट्रिज प्रा.लि. (२५० कोटी), रॉयल इंक ॲन्ड इक्वीपमेंटस्‌ प्रा.लि. (५ कोटी), शिवम टीप्स इंडस्ट्री (१० कोटी), ॲपक्राप्टझ्‌( १ कोटी), श्री जिनमाता डाइंग अँड प्रिंटींग मिल्स प्रा.लि.( २७१.४१ कोटी), ॲपेक्स प्रिंटींग टेक्नॉलॉजी प्रा.लि. (१५ कोटी), सनव्हेस्टा पाईप प्रा.लि. ( ८ कोटी), नहार फ्रोजन (१० कोटी), सॅनसन इंडस्ट्रिज (१०० कोटी), सिग्नेचर इंटरनॅशनल फुड इंडिया, प्रा.लि. (१०० कोटी), नोबेल हायजिन प्रा.लि. ( ४० कोटी), आशापुरा रबर (१० कोटी), कोनार्क फॅबटेक इंडिया प्रा. लि. (१० कोटी) यांनी गुंतवणुकीसाठी उत्सूक असल्याचे पत्र निमास सादर केले.

सदर गुंतवणुकीचे प्रस्ताव एमआयडीसी कार्यालयाच्या माध्यमातून उद्योगविभागाकडे पाठविले जाणार असून त्यानंतर या प्रस्तावांसोबत सविस्तर चर्चा करून गुंतवणुकीचे प्रत्यक्ष चित्रण समोर येणार असल्याचे निमा सरचिटणीस उदय खरोटे व गुंतवणूक उपसमिती अध्यक्ष आशिष नहार यांनी स्पष्ट केले. उदघाटन समारंभात श्रीश्री रविशंकर यांच्यावतीने अरविंद वाचस्वी यांनी गुंतवणुकीचा पहिला प्रस्ताव सादर केला होता.

योगगुरू रामदेव बाबा यांनीही नाशिक औद्योगिक क्षेत्रात असलेल्या क्षमता लक्षात घेत उदयोग उभारणीबाबत उत्सुकता दर्शविली होती. यापार्श्वभूमीवर नाशिक औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी होणारी मागणी ही निश्चितच येणाऱ्या काळात नाशिकच्या औद्योगिक विकासाला झळाली देणारी आणि रोजगार निर्मितीसाठी महत्तवाची ठरणार आहे. शासन स्तरावरून नोटकागद कारखाना, संरक्षण क्षेत्रातील उद्योग तसेच केंद्रीय स्तरावरून येणारे बीपीओ सेंटर्स या माध्यमातून येणाऱ्या काळात नाशिक औद्योगिक क्षेत्राला खऱ्या अर्थाने गती मिळणार असल्याचे चित्र आहे.

निमाने आयोजित केलेल्या मेक इन नाशिक या उपक्रमाचा उद्देश या माध्यमातून सफल होत असल्याचे निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*