‘मेक इन महाराष्ट्र’ सोबत ‘मेक इन नाशिक’चेही ब्रॅण्डिंग करणार – मुख्यमंत्री

0
मुंबई (विशेष प्रतिनिधी)| महाराष्ट्र उद्योगासाठी फेवरेट डेस्टीनेशन आहे. त्यामुळे अनेक कंपन्या महाराष्ट्रात उद्योग स्थापण्याच्या बघत आहे. पुण्यानंतर औद्योगिक विकास हा नाशिकचा होत आहे.

मेक इन नाशिक ही संकल्पना खूप चांगली असल्याचे सांगत निमाने सादर केलेल्या प्रोजेक्टचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मेक इन नाशिक चे आता आम्ही मेक इन महाराष्ट्रसोबत ब्रॅण्डिंग करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मेक इन नाशिक, नेहरू सेंटर मुंबई येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

समृद्धी एक्स्प्रेस हा नाशिकला काय देणार असे आपण म्हणतो नाशिकची यातून कनेक्टीव्हीटी वाढणार असून उद्योगजगताला भरारी यातून मिळणार आहे तसेच JLPT पोथचादेखील विकास होणार आहे.

नवनव्या कंपन्या जेव्हा महाराष्ट्रात दाखल होतील तेव्हा त्यांना कुठे जागा द्यायची, त्यांना आवश्यक सोयी सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून द्यायच्या त्यातील कोणकोणती शहरे समाविष्ट करून घ्यायची या यादीत नाशिकचे देखील आम्ही नाव घेतले आहे.

नाशिकच्या ओझरमध्ये असणाऱ्या एचएएल चाही रोजगार निर्मितीसाठी वापर होईल. तसेच नाशिकमधून लवकरच हवाई सेवेला प्रारंभ केला जाणार आहे त्यामुळे अनेक उद्योग यायला पर्याय नाशिककडे उपलब्ध असतील.

नाशिकमध्ये अग्रो प्रोसेसिंगसाठी  मोठ्या इंडस्ट्रीचा विकास झाला आहे. त्यासाठी फूड बास्केट आणि वेजिटेबल बास्केटच्या माध्यमातून अजून चांगला विकास साधता येणार आहे.

फूड प्रोसेसिंगसाठी प्रस्ताव तयार करा सबसिडी देण्याचे कार्य सरकार करेल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. नाशिकला ऐतिहासिक, धार्मिक परंपरा लाभली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये हजारो पर्यटकाची नियमित मांदियाळी असते. कुंभमेळा कुठलीही हानी न होता पार पडला यामुळे त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजनांचे कौतुक केले.तसेच पर्यटन विकासासाठी नाशिकच्या पर्यटन विकासाठी राज्य  सरकारच्या पर्यटन विभागाकडून आराखडा मंजूर करू असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

मेक इन नाशिक, नेहरू सेंटर मुंबई येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Posted by Deshdoot on 30 मे 2017

LEAVE A REPLY

*