महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीगसाठी खेळाडू करारबध्द

0

जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष लांडगे यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा तालीम संघ आयोजित महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग या राज्यात पहिल्यांदा होत आहेत. कोल्हापूर, पुणे आणि नगरमध्ये होणार्‍या या स्पर्धेत खेळणार्‍या राज्यातील 32 खेळाडू आणि 8 संघ मार्गदर्शक यांना आयोजकांमार्फत करारबध्द करण्यात असल्याची माहिती जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी दिली. 

राज्यात पहिल्यांदा महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग ही स्पर्धा होणार आहे. राज्यातील दर्जेदार मल्ल जगासमोर यावेत, दुर्लक्षीत होत असलेल्या कुस्तीला अधिकाअधिक प्रेक्षक मिळाव्यात हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये होणार्‍या या स्पर्धेत राज्यातील 32 मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत खेळणारा मल्ल हा महाराष्ट्र केसरी, कुमार केसरी, केडेट किंवा राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळाचे कसब आजमावून यशस्वी झालेला आहे.
स्पर्धे दरम्यान राज्यातील खेळांडूसोबत 16 राष्ट्रीय व 16 आंतरराष्ट्रीय मल्लांचा देखील सहभाग राहणार आहे. यामुळे पहिल्यांदा होत असलेल्या या व्यवसायिक कुस्ती स्पर्धेबाबत कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. स्पर्धेचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ब्रिजभूषण शरणसिंग, बाळासाहेब लांडगे, संदीप भोंडवे हे आहेत. या स्पर्धेचे ब्रॅन्ड अँबेसिडर द ग्रेट खली व पैलवान योगेश्‍वर दत्त हे असणार आहेत.
रविवारी झालेल्या करारमध्ये राहुल अवारे, उत्कर्ष काळे, माउली जमदाडे, किरण भगत हे राष्ट्रीय खेळाडू, सागर बिराजदार, बाला रफिक शेख, राजेश कुमार, संदीप काटे, गोपाल यादव, मारूती जाधव, अनिल जाधव, विष्णू खोसे, किशोर नखाते, विजय पाटील, अजित शेळके, संतोष गायकवाड, जयदीप गायकवाड, समीर देसाई, रणजित नलावडे, नामदेव कोकाटे, शिवराज राक्षे, सगीता खोगट, स्वाती शिंदे, नंदनी सांळुके या राज्य पातळीवरील खेळांडूंचा सहभाग आहे.
स्पर्धेसाठी संदीप पठारे पुणे, दादा लवाटे, कोल्हापूर, संदीप पाटील कोल्हापूर, सईद चाऊस बीड, जगमाल सिंग मुंबई यांच्यासह रशिया, युक्रेन, ब्राजील, मंगोलीया, जॉर्जीया, स्वीडन आणि नॉर्वे येथील आंतरराष्ट्रीय रेफ्री राहणार आहेत. पैलवानाची पंढरी असणार्‍या कोल्हापूरला स्पर्धेचे उद्घाटन सोहळा आणि पात्रता फेर्‍या खेळवल्या जाणार आहेत. पिंपरी चिंचवड येथे पात्रता फेर्‍या होऊन नगरच्या वाडिया पार्कवर उपांत्य सामने व अंतिम फेर्‍या खेळवल्या जाणार आहेत.
स्पर्धेत एकूण 61 लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. प्रथम विजेत्याला 21 लाख रुपये व अर्धा किलो सोन्याची गदा देण्यात येणार आहे. हा पुरस्कार उद्योजक सायरस पुनावाला हे देणार असून उपविजेत्याला 11 लाख रुपये रोख व पाच किलो चांदीची गदा तसेच तृतीय विजेत्याला 7 लाख रुपये व चषक देण्यात येणार आहे.
या करार सोहळ्याला जिल्हा तालीम संघाचे कार्याध्यक्ष राम लोंढे, सचिव धनंजय जाधव, शहर तालीम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, दत्तात्रय अडसूरे, राम नळकांडे, नाना डोंगरे, हंगेश्‍वर धायगुडे, विलास चव्हाण, छबुराव जाधव, युवराज पठारे, मोहन हिरणवाळे, बबलू धुमाळ, गणपत खेमनर, कुंडलिक चिंधे, प्रमोद भांडकर, विक्रम बारवकर आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*