Video : असा झाला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

0

लातूर : नियोजित दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी ठिक ११.५८ वाजता हेलिकॉप्टरने मुंबईला जाण्यासाठी निघाले.

त्यावेळी त्यांच्यासह ६ जर त्यात होते. त्यापैकी २ हेलिकॉप्टरचे क्रू मेंबर होते. पायलटला हवेच्या दाबात चढउतार जाणवल्याने त्याने हेलिकॉप्टर उतरविण्याचा निर्णय घेतला.

मात्र तारांना अडकल्याने हेलिकॉप्टरचे कोसळले.त्यात हेलिकॉप्टरचे बरेच नुकसान झाले असले, तरी त्यातील सर्वजण सुखरूप बचावल्याची माहिती जीडीसीएने दिली आहे.

दरम्यान टेक ऑफनंतर ५० ते ६० फुट उंचीवर गेल्यानंतर ते अचानक कोसळले़ नजीकच्या असलेल्या वीज खांबावरील तारांना हेलिकॉप्टरचे पंखे अडकले.

काही क्षणातच म्हाडा झोपडपट्टीत असलेल्या रस्त्यावरील वीजडीपी व ट्रकच्या मध्यभागी कोसळले़ हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सचिव प्रवीण परदेशी व अन्य दोघे असल्याचे समजते़.

या अपघातात पायलट किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे़. वीज डीपी आणि ट्रकच्यानजीक भरत कांबळे यांचे घर आहे़ या घराच्या भिंती पडल्या आहेत़.

अपघाताचा व्हिडीओ बघा :

LEAVE A REPLY

*