देशातल्या सर्वात लांब पुलाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामच्या दौर्‍यावर आहेत.

आसाममध्ये ब्रम्हपुत्रेच्या उपनदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या (9.15 किमी)पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज(शुक्रवारी) लोकार्पण करण्‍यात आले.

आसाममधील ढोला आणि अरुणाचलमधल्या सदियाला जोडणारा हा पूल लष्करासाठी अत्यंत फायद्याचा असल्याचे प्रतिवादन मोदींनी यावेळी केले.

आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यावेळी उपस्थित होते.

तिनसुकिया येथे ब्रम्हपुत्रा नदीच्या उपनदीवर बांधण्यात आलेला हा देशातील सर्वात लांबीच्या पूल आहे. या पुलाची लांबी 9.15 किलोमीटर आहे.

हा पूल बांधण्यात आल्याने आसम आणि अरुणाचल प्रदेशमधील अंतर 165 किलोमीटरने कमी होणार आहे.

पुलापासून चीनची सीमारेषा 100 किमी (हवाई) अंतरावर आहे.

LEAVE A REPLY

*