LIVE : VIDEO : Photogallery : राहाता : विविध शेतकरी संघटनांकडून शिवाजी चौकात चक्का जाम आंदोलन

0

LIVE : अहमदनगर : राहाता येथे विविध शेतकरी संघटनाच्या वतीने संपूर्ण कर्ज मुक्तिसाठी शिवाजी चौकात महामार्ग अडवत चक्का जाम आंदोलन केले.

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन परिसरात दहेगांव बोलका चौफुलीवर मा.माणिकराव देशमुख (अध्यक्ष : शेतकरी सघटंना) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

शहरात चक्काजाम आंदोलन सुरु असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. 

 नगर शहरातील मार्केट यार्डमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शनिशिंगणापूर -राहुरी मार्गावरील ब्राम्हणी बसस्थानक येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी रास्तारोको करून ब्राम्हणीतील शेतकऱ्यांनी महसुल व पोलिस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.

नगर शहरातील मार्केट यार्डमध्ये प्रहार संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

अकोले शहरात हजारो विद्यार्थी शेतकरी कर्जमाफी साठी रस्त्यावर उतरले आहेत.शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे राज्य समनव्यक डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले -संगमनेर राज्यमार्गावर बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलनास सुरुवात झाली आहे.यामुळे कोल्हार घोटी राज्यमार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. या आंदोलनास महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.

पुणतांब्यातही चक्काजाम

सबंधित बातमी : सरसकट कर्जमाफी हवी : आज चक्काजाम

व्हिडीओ : नगर शहरातील मार्केट यार्डमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

नगर शहरातील मार्केट यार्डमध्ये प्रहार संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलन

 

 

LEAVE A REPLY

*