शालेय विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

0
पेठ (वार्ताहर) | पेठ तालुक्यातील शिंगदरी ते मुरूमटी दरम्यान मत्स्यगंगा नदीवर पूल नसल्याने येथील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागते आहे.

पेठ तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथील बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. ग्रामस्थांसह येथील प्रत्येकाला जीव मुठीत घालून धोका पत्करावा लागतो.

येथील ग्रामस्थांनी अनेकदा पुलासाठी मागणी केली होती. मात्र अद्याप त्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत. बंधारे तुडुंब भरले असल्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

LEAVE A REPLY

*