LGचा नवा स्मार्टफोन ‘LG Q6’ लाँच

0

एलजीनं ‘LG Q6’ स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

ज्याची किंमत 14,990 रुपये आहे.

बाजारात या स्मार्टफोनची स्पर्धा मोटोरोला आणि ओप्पोच्या स्मार्टफोनशी असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5 इंच स्क्रीन दिली असून याचं रेझ्युलेशन 2160×1080 पिक्सल आहे.

यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर आहे. तसेच 3 जीबी रॅमसह 32 जीबी मेमरीही देण्यात आली आहे.

हा फोन अँड्रॉईड नॉगट 7.1 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

याची बॅटरी 3000 mAh आहे. तसेच यात 4G VoLTE, वाय-फाय, ब्ल्यूटूथ, यूएसबी पोर्ट, यासारखे अनेक फीचर आहेत.

LEAVE A REPLY

*