लक्ष्मी त्रिपाठी म्हणतात, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय हा बलात्कारच

0

पुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय सरकारला बाजाराप्रमाणे वाटतो. त्यामुळे बारगेनिंगची भाषा सुरू आहे,  हे करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत लक्ष्मी त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली.

त्रिपाठी पुण्यातील राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उपस्थित होत्या. त्यांचे यावेळी भाषण झाले. उपस्थितांनी त्याला जोरदार पाठिंबा दिला. त्यानंतर त्रिपाठींनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कर्जमाफी दिली तर आत्महत्या होणार नाहीत याची हमी द्या, या भूमिकेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, आत्महत्या हा बाजार आहे काय? कोणाबरोबर बारगेनिंग करता? काय लावल आहे तुम्ही? जस्टिस वर्मा यांच्या ऑर्डरमुळे बलात्कारावर कायदा आला म्हणून बलात्कार थांबले कां? शेतकऱ्यांवर सध्या बलात्कारच सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबद्दल त्या म्हणाल्या, समाजाने जागृत झाले पाहिजे. आपल्याला शेतकरी जगवतात, याची जाण ठेवून त्यांच्यासाठी काम करायला पाहिजे. मातीचे मोल, शेतकऱ्यांचा अभिमान नसलेल्या सुशिक्षितांची संख्या मोठी आहे.

राजकीय व्यक्‍तींची तर चांगले करण्याची इच्छाशक्‍ती नाही. मात्र किन्नर लोक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. माझ्या श्‍वासात श्‍वास आहे तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबरोबर राहणार आहे.

लक्ष्मी नारायण त्रिपाठी ह्या एक टीवी कलाकार असून भरतनाट्यम नर्तिका आहेत. तसेच त्या सामाजिक कार्यकर्ता देखील आहेत. तृतीयपंथीय समाजासाठी त्या कार्य करतात.  लक्ष्मी ह्या बिगबॉस सीजन ५ च्या प्रतिनिधीदेखील होत्या.  टीवी शो “सच का सामना”, “दस का दम” और “राज पिछले जनम का” मध्येही त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय समाजाचे त्या आशिया खंडाचे प्रतिनिधित्वदेखील त्यांनी केले आहे.  शेतकरी प्रश्नावरील आंदोलनात त्या सहभागी झाल्याने त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*