वकील संघटनेची कार्यकारिणी बरखास्त

0

अ‍ॅड. कल्याण पागर, निवडणूक निर्णय अधिकारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात नगरचा बार कौन्सिल नावाजलेला आहे. या बारचा सदस्य असलेला वकील वर्ग एकसंध असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांच्यात फूट पडली आहे.

विद्यमान अध्यक्षांनी काही सदस्यांच्या नादाला लागून नगरच्या बारमध्ये दोन गट निर्माण केले आहेत. अध्यक्षांनी काम कारताना बारला कधीही विश्वासात घेतले नाही, त्यामुळे वकील संघटनेच्या कार्यक्रमांना वकील कमी व इतर नागरिकच जास्त असत. वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय जनरल बॉडीने घेतला आहे. घटनेचा आधार घेत हा निर्णय घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. कल्याण पागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अ‍ॅड. पागर लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. असे प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे. तसेच या बारची 26 जानेवारीलाच मुदत संपलेली होती. मात्र अध्यक्ष पदावरून पायऊतार होत नव्हते असे पत्रकात म्हटले आहे. यावेळी अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ तुळशीराम बाबर यांची निवड करण्यात आली. यात अ‍ॅड.कारभारी गवळी अ‍ॅड. सुरेश लगड यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर मन्सूर जहागीरदार, नंदू गाडे,अ‍ॅड. एम.के.काकडे,महेश काळे आदींचे भाषणे झाली. रमेश जगताप,मंगेश सोले, अनिता दिघे, राजेश कातोरे, बाळासाहेब पवार यांच्यासह व बारचे 80 टक्के वकील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*