भूमिअभिलेख कार्यालयाचा सावळा गोंधळ

0
ऑनलाईनसाठी अधिक पैसे, मध्यस्थांची चांदी 
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून मिळणारी कागदपत्र आता 1 मे पासून आपलं सरकार महाराष्ट्र शासन या साईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करून देण्यास सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातून आलेल्या सामान्य नागरिकांना पंधरा दिवसापासून आपली कुठलेच कागदपत्र वेळेवर मिळत नाहीत.
त्यात या कार्यालयाचे सावळा गोंधळ आणि नागरिकांना योग्य माहिती उपल्बध करून देत नसल्याने कुठलाच कागद वेळेवर मिळेल, याची शाश्वती राहिली नसल्याने ऑनलाईन अर्ज करून इ पेमेंटसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम काही मध्यस्थ उकळत आहेत.
उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात ग्रामीण आणि शहरातील मिळकतीबाबत नक्कल, अपिलांचे निर्णय, जमीन मोजणी करणे, मोजणी नकाशा, आकारफोड, कमी जास्त पत्रक, बिनशेती, फेरफार नोंदी करणे, मिळकत पोटविभागणी, मिळकत पत्रिका तयार करणे, मिळकतीवरचा बोजा कमी करणे, बोजा चढवणे अशी कामे आणि घरांची उतारे, जमिनीचे नकाशे मिळवण्यासाठी भूमिअभिलेख श्रीगोंदा यांच्या कार्यालयात आलेले तालुक्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनापासून रोजच हेलपाटे मारावे लागत आहेत.
पहिले दहा दिवस तर आलेल्या नागरिकांना घरचा रस्ताच कर्मचारी दाखवत होते. त्यानंतर कागदपत्र मिळवायची असतील तर बाहेरून अर्ज करा म्हणून नागरिकांना सांगण्यात आले. यामुळे अनेक जण माहीत नसल्याने हेलपाटे मारत होते.
महाराष्ट्र सरकारने लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत आपले सरकार या साईटवरून ऑनलाईन अर्ज प्रकारीये द्वारे भूमी अभिलेख द्वारे मिळणारे सेवासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली. मात्र हे अर्ज करण्यासाठी नागरिकांना पहिले वीस ते चाळीस रुपयात होणार्‍या कामासाठी दोनशे तीनशे रुपये मोजावे लागत आहेत.
याबाबत उपाधीक्षक कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना योग्य माहितीच दिली जात नाही. या कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. कोण कार्यालय सोडून कुठे गेले याची माहिती मिळत नाही.
उपअधीक्षक सुद्धा नसल्याने आणि माहिती देण्यास कुणीच नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

पहिल्या पेक्षा लूट वाढली ः सुद्रिक
भूमी अभिलेख कार्यलयात अगोदर कामासाठी रांगा लागत होत्या कुठलेच काम वेळेवर होत नव्हते आता राज्य सरकारच्या लोकसेवा हक्क अधिनियमात भूमी अभिलेख कार्यालयातील कागदपत्रांसाठी अर्ज करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत . पहिले वीस तीस रुपये अधिकृत पावती देऊन होणाय्रा कामासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणारे चार पट रक्कम घेतात . हा रज केल्यांनतर अर्ज ऑनलाईनच या कार्यालयाकडे जातो ते कुठल्या कागदसाठी किती रक्कम भरायची याचा मॅसेज देतात मात्र यात अधिक वेळ जातो आणि पैसे ही अधिक द्यावे लागत असल्याची प्रतिक्रिया शिवसंग्राम संघटनेचे जिल्हा सरचिटणीस मछिंद सुद्रिक यांनी दिली.

LEAVE A REPLY

*