मोरगाव खुर्द परिसरातील भूजलात घट

0
मोरगाव खुर्द, ता. रावेर |  वार्ताहर :  दर वर्षापेक्षा या वर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात पडला.  परंतु पाण्याचे नियोजन चुकल्याने उन्हाळ्याच्या सुरवातीला परिसरातील वाघोड, मोरगांव बु॥ तामसवाडी, खिरवड या गावातील भुजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे.

रावेर तालुका हा केळी उत्पादनाचे मोठे क्षेत्र आहे. बहुतांशी शेतकरी केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात. मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झाल्याने केळीला पाणी देण्यासाठी अनेकांनी विहिरींसह ट्युबवेल खोदल्या आहेत.केळीला जास्त पाणी लागत असते.

वाढत्या तापमानामुळे जास्त गरज

फेब्रुवारीपासून उन्हाचा चटका बसत आहे.मार्च महिन्यात तर तापमान ४३ अंशावर गेल्याने अनेक केळीच्या बागा उन्हामुळे जळू लागल्यात. तर केळीची झाडे करपू लागली. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला. यावर पर्याय म्हणून नियोजनापेक्षा पाण्याची मात्र अधिक प्रमाणात देत केळीचे वाढत्या उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न होत आहे.

जुन्या आटल्याने नविन बोअरवेल

जुन्या विहीरी आटल्याने तर काही टप्पा देवू लागल्याने काही शेतकर्‍यांनी नविन बोअरवेल केली आहे. जुन्या व नव्या अशा दोघांतून पाण्याचा उपसा करून केळीला देत आहे. त्यामुळे परिसरातील भूजलाच्या पातळीत कमालीची घट होत आहे.

याबाबत शेतकर्‍यांना चिंता असली तरी लाखो रूपयांची पिके वाचविणे आणि पर्यायाने शेतकरी जगण्यासाठी हा उपसा करावा लागत असल्याचे काही केळी उत्पादक शेतकर्‍यांनी सांगीतले.

केळीअंतर्गत रब्बीच्या पिकातही होणार घट

पाण्यामुळे केळी अंतर्गत रब्बीचे येणारे पिके सुद्धा उत्पन्नात घटतील अशी शेतकर्‍यांमध्ये चर्चा ऐकावयास मिळत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीला जर हे परिस्थिती आहे तर मे-जून या महिन्यात काय स्थिती राहील याबाबत शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*