कोपर्डी प्रकरण : पत्रकारांना मज्जाव

0

पोलिसांनी केली धिटाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील कोपर्डी खटल्याची अंतीम सुनावणी अंतीम टप्प्यात आहे. या खटल्यादरम्यान पत्रकारांना न्यायालयात बसून वार्तांंकन करता यावे यासाठी अर्ज देण्यात आला आहे. न्यायालयाने परवानगी दिली असताना देखील पोलीस प्रशासनाने त्यांना विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा पोलिसांच्या या धिटाईचा प्रत्यय पहावयास मिळाला आहे.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर अनेकदा हल्ले झाले आहेत. त्यामुळे न्यायालयाने या खटल्यात वकील, नातेवाईक, मित्र, पत्रकार अशा कोणालाही बसण्यास परवानगी दिली नाही. मात्र हा खटला राज्यभर गाजला आहे. त्यामुळे त्याचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करता यावे यासाठी पत्रकारांना खटला सुरू असताना बसण्याची परवानगी द्यावी असा विनंती अर्ज देण्यात आला होता. त्याला मान्यता देत न्यायालयाने ठराविक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर दोन दिवस काही पत्रकारांनी खटल्यादरम्यानचे वार्तांकन देखील केले होते.
मात्र सोमवारी (दि.22) या खटल्याची सुनावणी सुरू असताना काही पत्रकार आत गेले असता त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे पोलीस व पत्रकार यांच्यात काही काळ तू-तू मै-मै झाली. भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी सांगितले की पत्रकारांना आत सोडण्यात यावे असे आदेश न्यायालयाकडून प्राप्त झालेले नाही. त्यामुळे कोणाला आत सोडता येणार नाही. गेल्या दोन वेळेस पत्रकार सुनावणी सुरू असताना आत बसले तेव्हा कोणी विरोध केला नाही. मात्र आज अचानक पत्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला काय? असा प्रश्‍न उपस्थित केला असता, पोलिसांनी आत जाण्यास नकार दिला.
न्यायालयाचे आदेश आणा नंतर आत प्रवेश करा या भूमिकेवर ते ठाम राहिल्यामुळे दोन्ही गटांत तणाव निर्माण झाला होता.

नोडल ऑफिसरची उलटतपासणी
कोपर्डी खटल्याची अंतीम टप्प्यात सुनावणी सुरू आहे. आरोपींनी वापरलेले सिमकार्ड, त्यांचे एकमेकांशी झालेले संपर्क यांची सरतपासणी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी घेतली आज अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे व अ‍ॅड. प्रकाश आहेर हे उलटतपासणी घेत आहेत. यानंतर तपासी अधिकारी शशिराज पाटोळे यांची महत्त्वाची साक्ष होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*