खिर्डीच्या कन्येचे गुजरात येथे व्याख्यान

0

वैष्णवी माकोणेचे सर्वत्र कौतुक

खिर्डी (वार्ताहार)- श्रीरामपूर तालुक्यातील गरीब कुटुंबातील वैष्णवी माकोणे हिला गुजरात येथे व्याख्यानासाठी आमंत्रण आल्याने तिचे परिसरात कौतुक होत आहे.  अखंड मेहनत दुरदम्य इच्छाशक्ती, कुटुंब आणि मित्रपरिवारांकडून मिळालेली साथ यांच्या जोरावर श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील वैष्णवी आप्पासाहेब माकोणे या 16 वर्षांच्या मुलीने तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण करून दिलाय, घरची परिस्थिती अगदी नाजुक, आई-वडिल मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात, आई वडिलांकडून कोणत्याच प्रकारचा हट्ट न धरता तिने आपल्या इच्छाशक्तीवर आपले कर्तृत्व निर्माण केले आहे.

वैष्णवीला लहानपणापासूनच धार्मिक क्षेत्राची आवड असल्याने आई वडिलांनी तीच्या या सुप्तगुणांना वाव दिला. वैष्णवीने लहानपणापासूनच ग्रंथ, कांदबर्‍या, थोर पुरुषांचे आत्मचरित्र, यांच्याशी मैत्री करत ते आत्मसात केले.
वयाच्या 10 व्या वर्षापासून वैष्णवीने व्याख्यानाला सुरुवात केली तालुक्यात तिने अनेक ठिकाणी आई वडील, व्यसनमुक्ती, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी या विषयांवर व्याख्याने केली.

आता वैष्णवीला तालुक्यातून नव्हे तर राज्यात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जात असून गुजरात येथील यंग स्टार गृप आयोजित गणपती उत्सव-2017 या कार्यक्रमामध्ये व्याख्याने देण्यासाठी गुजरात येथे आमंत्रित केले आहे.
नुकत्याच एक वर्षापूर्वी अहमदनगर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चात तिने चांगल्याप्रकारे भाषणही केले होते. वैष्णवी ही सध्या पाचेगाव याठिकाणी इयत्ता 10 मध्ये शिकत असून अभ्यासाबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रात तिने आपला चांगला ठसा उमटविला आहे. यामुळे वैष्णवीचे सर्वत्र कौतुक होते आहे.

 

LEAVE A REPLY

*