बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाचे गुप्तांग कापले; केरळमधील घटना

0

केरळमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या ५४ वर्षीय व्यक्तीचे पीडित महिलेने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जखमीला तिरुवअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी संशयित आरोपी तीन वर्षांपासून लैंगिक छळ करत होता, असा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

संशयित आरोपी केरळमधील कोल्लम येथील आश्रमात राहत असून शुक्रवारी पीडिता तिच्या कुटुंबीयांसह आश्रमात गेली होती. त्यावेळी संशयित आरोपीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. आपल्यावर होत असलेल्या अत्याचारास पीडितेने विरोध केला.

तीन वर्षांपासून तो पीडितेवर लैंगिक अत्याचार करत होता. त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती.

पोलिसांनी त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*