केदार शिंदे यांची पहिली हिंदी मालिका ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ प्रेक्षकांच्या भेटीला

0

भरभरून हसवणारे सिनेमे , भन्नाट दिग्दर्शन , आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून केदार शिंदे यांची ओळख आहे . मराठी चित्रपट सृष्टीमध्ये केदार शिंदे हे नाव अगदी आदराने घेतलं जात . मराठी सिनेमा मध्ये केदार शिंदे यांचे चित्रपटांचा जणू ट्रेंडच बनला आहे आणि केदार शिंदे म्हटलं तर कॉमेडी आलीच . आणि आता हीच भन्नाट कॉमेडी च्या संकल्पनेसोबत हिंदी मालिका घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे “क्या हाल मिस्टर पांचाल ” .

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मराठी मध्ये अनेक सिनेमे आणि नाटकांच दिग्दर्शन केल आहे , यांची हिंदीमध्ये दिग्दर्शक म्हणून “क्या हाल मिस्टर पांचाल ” हि पहिली मालिका लोकांच्या भेटीला हजर झाली आहे . एक आई आपल्या मुलासाठी सर्वगुण संपन्न अशी वधु च्या शोधात असते आणि या दरम्यान ती आपलं मागणं देवाकडे मांडते . भगवान शिव जी त्या आईच्या प्रार्थनेतून प्रसन्न होतो आणि ५ वेगवेगळ्या स्वभावाच्या वधू चा आशीर्वाद देतो . आता ह्या सर्व गोंधळामध्ये बिचार्या मुलाची काय अवस्था होते याची विनोदी कथा म्हणजे “क्या हाल मिस्टर पांचाल ” .

विनोदी कथांसाठी केदार शिंदे अगदी माहीर आहेत यात काही वाद नाही . यांची हि पहिलीवहिली मालिका असल्यामुळे सगळं नव्याने सुरु करण्यातही एक वेगळी मजा येत आहे असं ते सांगतात , त्याचप्रमाणे ते म्हणतात कि , ” हि सिरीयल माझ्यासाठी जितकी नवी आहे तितकी सर्व कलाकारांसाठी सुद्धा नवी आहे . इथे काम करणारा प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री हे त्यांच्या आधीच्या मालिका व सिनेमांमध्ये गंभीर भूमिका केलेली आहे . ह्या सर्व कलाकारांना विनोद शिकवणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे काम करण्यात सुद्धा तितकीच मज्जा येत आहे ”

केदार शिंदे दिग्दर्शित तसेच विपुल शाह आणि ऑप्टोमिस्ट्रीक्स प्रोडक्शन निर्मित “क्या हाल मिस्टर पांचाल ” हि २८ ऑगस्ट २०१७ पासून स्टार भारत वाहिनी वर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे .

LEAVE A REPLY

*