कोपर्डी, निर्भया प्रकरण : मुुंबईत निघणार कॅन्डल मार्च

0

कर्जत (प्रतिनिधी) – तालुक्यातील कोपर्डी येथील निर्भया अत्याचार प्रकरणास 13 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.

या दिवशी मुंबई येथील गेट वे ऑफ इंडीया येथे कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय मराठा महासंघाचे युवा महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बलराम भडेकर यांनी येथे दिली.

कोपर्डी येथील 13 जुलै रोजी घडलेली घटना हा राज्याला काळीमा फासणार्‍या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. सर्वत्र संतापाने सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला.

या घटनेमध्ये नराधमांना फाशीची शिक्षा मिळेपर्यत स्वस्त बसणार नाही.

मुबई कॅन्डल मोर्चात हजारोंच्या संख्येत सहभागी व्हावे. सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा, अशी आमची मागणीचे निवेदन राज्य सरकराचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना दिले आहे. यावेळी राजेद्र फाळके, अंकुश जानभरे, नितीन कोल्हे, अशोक पावणे, सुनिल खराडे, यांचेसह अनेक जण उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*