भंडारदरा पाणलोटात काजव्यांचे आगमन

0
भंडारदरा (वार्ताहर) – नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर असणारा कळसूबाई शिखर परिसर आणि लगतची गावांमध्ये काजव्यांचे आगमन झाले असून त्यांचे लखलखते सौंदर्य सर्वांना आकर्षित करीत आहेत.
कळसूबाई परिसर तसेच भंडारदरा धरण परिसर, घाटघर, साम्रत आदी परिसरात रात्रीच्या किर्र अंधारात काजवे चमकू लागले आहेत. सध्या हे प्रमाण कमी असलेतरी येत्या काही दिवसात काजव्यांच्या प्रकाशात हा परिसर जणू नभांगण पृथ्वीवर आले आहे असे भासेल.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी केवळ दहा ते पंधरा दिवस या काजव्यांचा मुक्काम या परिसरात असतो.त्यामुळे दुर्मिळ समजला जाणारा हा योग आणि अनुभूती साधण्यासाठी हौशी पर्यटक या परिसरात रात्रभर तळ ठोकून असतात. काजव्यांचे आगमन झाल्याने मान्सूनचे लवकरच आगमन होईल असा आदिवासी बांधवांचा कयास आहे.

LEAVE A REPLY

*