जायकवाडी निम्मे भरले!

0

अस्तगाव (वार्ताहर)- पावसाची रिपरिप थांबल्याने गोदावरीतील विसर्ग 7924 क्युसेकवर आला आहे. जायकवाडी जलाशयाची पाण्याची पातळी काल रात्री 9 च्या आकडेवारी नुसार 50.27 टक्के झाली आहे. काल या धरणात गोदावरीतून 11 हजार 851 क्युसेक ने पाण्याची आवक सुरुच होती.सह्याद्रीच्या  घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंदावला आहे. लहान मोठ्या श्रावणसरी बरसत आहेत.

मात्र घाटमाथ्यावरील धबधबे वाहत असल्याने पाण्याची आवक काही अंशी सुरुच आहे. दारणातून काल रात्रीच्या आकडेवारी नुसार 2538 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. काल सकाळी हा विसर्ग 3976 क्युसेक ने सुरु होता. त्यात घट झाली. गंगापूर मधून काल सकाळी 6 वाजता 1389 क्युसेक ने विसर्ग सुरु होता. सायंकाळी तो 926 क्युसेकने सुरु होता. कडवातून 360 क्युसेकने, भोजपूर मधून 190 क्युसेकने, आळंदीतून 243 ने, वालदेवीतून 241 क्युसेकने तर भावलीतून 290 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. या पालखेड मधून 1502 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

या धरणातील विसर्ग कमी झाल्याने काल दिवसभर नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीत 7924 क्युसेकने विसर्ग सुरु होता. काल सकाळी 6 वाजेपर्यंत या धरणातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने एकूण 33.6 टीएमसी इतक्या पाण्याचा विसर्ग केला आहे. याधरणातुन पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरीच्या उजव्या कालव्यातून 300, डाव्या कालव्यातुन 100 तर जलद कालव्यातून 700 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.

खाली जायकवाडी जलाशयात काल रात्री 9 च्या आकडेवारी नुसार हे धरण 50.27 टक्के भरले आहे. या धरणात उपयुक्त साठा 1091.441 दलघमी म्हणजेच 38.5 टीएमसी पाणीसाठा तयार झाला आहे. गोदावरीचे पाणी दाखल होण्यापूर्वी हा साठा सुमारे 14 टीएमसी इतका होता. या धरणात मृतसह एकुण साठा 1829.548 दलघमी म्हणजेच 64.6 टीएमसी इतका साठा आहे. काल रात्री 9 वाजता या धरणात गोदावरीतून 11851 क्युसेकने पाणी नव्याने दाखल होत होते. याच वेळी नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍यातुन 7924 क्ुयसेकने विसर्ग सोडण्यात येत होता.

काल सकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील पाउस मिमि मध्ये असा- दारणा 11, घोटी 37, इगतपुरी 57, भावली 51 मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे. या कालवधीत दारणात 421 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. तर भावलीत 38 दलघफु पाणी दाखल झाले. तर गंगापूरच्या पाणलोटात गंगापूर येथे 2, काश्यपी 10, गौतमी 27, त्र्यंबक 12, अंबोली 27 मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

*