Friday, April 26, 2024
Homeनगरजायकवाडीतून 66 हजार क्युसेकने विसर्ग!

जायकवाडीतून 66 हजार क्युसेकने विसर्ग!

राहाता | तालुका प्रतिनिधी

गोदावरीतुन जायकवाडीच्या दिशेने 28767 क्युसेकने, प्रवरेतुन 7579 क्युसेकने तर मुळा धरणातुन 10000 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. खाली मराठवाड्यातही लहान मोठ्या नद्या जायकवाडीला मिळत असल्याने काल जायकवाडी धरणातुन 66024 क्युसेकने विसर्ग गोदापात्रात करण्यात येत आहे.

- Advertisement -

गेल्या चार पाच दिवसांपासुन नगर, नाशिक जिल्ह्यात पावसाचे धुव्वाधार आगमन होत आहे. अगोदरच धरणे पुर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे नव्याने येणारे पाणी विसर्गाच्या रुपात धरणातुन सोडले जात आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांचे विसर्गाचे पाणी गोदापात्रातुन दुथडी भरुन वाहत आहे. गुरुवारी दिवसभरात गोदावरीत नांदूर मधमेश्‍वर बंधार्‍यातुन 35 हजार क्युसेकहुन अधिकने विसर्ग करण्यात येत होता. नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडेतुन विसर्ग सुरु आहे. या धरणातील विसर्ग सोडण्यात येत असल्याने ओझर वेअरला हा विसर्ग 7579 क्युसेकने मिळत होता. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने प्रवरातुन वाहत आहे.

दुसरीकडे नगर जिल्ह्यातील मुळातुनही विसर्ग सुरु झाला आहे. काल सायंकाळी 6 वाजता 10 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. नगर, नाशिकच्या या धरणांचे पाणी व मराठवाड्यातील पाणी असे तुडूंब भरलेल्य जायकवाडी जलाशयात दाखल होत असल्याने जायकवाडी जलाशयातुन खाली तब्बल 66 हजार 24 क्युसेकने विसर्ग सुरु होता. जायकवाडीत उपयुक्तसाठा 98.51 टक्के इतका आहे. तर मृतसह एकूण साठा 101.5 टिएमसी इतका आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या