जायकवाडीकडे झेपावले 46 टीएमसी पाणी

0

नाशिक । दि. 23 प्रतिनिधी – नाशिकमधून जायकवाडी धरणात आतापर्यंत सुमारे 46 टीएमसी पाणी सोडण्यात आले. अजूनही नाशिकसह नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग सुरु आहे.

त्यामुळे यंदा मराठवाड्याची पाण्याची गरज या आठवड्यात पूर्ण होणार असल्याने पाण्याची पळवापळवी व त्यातून प्रादेशिक वादाची शक्यता कमीच आहे.

गेल्या वर्षी जायकवाडीत 83.27 टक्के पाणीसाठा होता. 1 जुन 2017 ला झालेल्या मोजणीत जायकवाडी धरणात 20 टक्के पाणी शिल्लक होते.

म्हणजे पूर्ण वर्षभरात जायकवाडीतील 83.27 टक्के पाण्यातील 63 टक्के पाणी वापरले गेले. आज 23 ऑगस्टअखेर जायकवाडी धरणात 62.50 टक्के पाणीसाठा झाला आहे.

ज्याप्रमाणे नाशिकमधील धरणातील सोडल्या जाणाऱया विसर्गाची तपासणी व आकडेवारी तेथील शिष्टमंडळानी पाहणी केली त्याप्रमाणे जायकवाडीतून सोडलेल्या कालव्यातील पाण्यांची आकडेवारी मात्र अजूनही पुढे आलेली नाही.

1 जून ते 23 ऑगस्ट पर्यन्त जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातुन जायकवाडीला आतापर्यन्त 46 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

आजमितीस जायकवाडीत 47 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. अजूनही नाशिक सह नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग सुरु आहे.

LEAVE A REPLY

*