काश्मीरमध्ये लष्करात महिला पोलिस जवानांची नियुक्ती करणार : लष्करप्रमुख

0
लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे की, काश्मीरमध्ये अनेकदा कारवाई दरम्यान दहशतवाद्यांकडून महिला आंदोलकांचा ढाल म्हणून वापर केला जातो. यामुळे आमच्यापुढे वेगळीच समस्या निर्माण होते. याचा सामना करण्यासाठी लष्करात महिला पोलिस जवानांची नियुक्ती करण्यात येईल.
रावत हे इंडियन मिलिटरी अॅकॅडमीच्या पासिंग आऊट परेडसाठी देहरादून येथे आले होते.
रावत म्हणाले, मोहिमेदरम्यान अनेकदा सामान्य लोकांचा सामना करावा लागतो. अनेकदा महिला आमच्या समोर येतात. त्यासाठी लष्करात महिलाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
सर्वप्रथम आम्ही महिलांना मिलिटरी पोलिस म्हणुन घेणार आहोत.

LEAVE A REPLY

*