मुक्ताईनगर विकासासाठी 52 कोटींचा आराखडा

0
जळगाव । दि.27 । प्रतिनिधी-राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्याचा समावेश करण्यात आला असून या तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणार्‍या पायाभू सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 52 कोटीचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे.
मुक्ताईनगरच्या विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिले.

राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी वाघ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील, जिल्हाग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे, अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांचेसह विविध यंत्रणाचे प्रमूख उपस्थित होते.

या आराखड्यानुसार या भागात 24 तास जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 9 कोटी रुपये, स्वच्छतेच्या उपाययोजनांसाठी 6.93 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी 1.03 कोटी, रस्त्यालगत गटार व चार्‍या बांधण्यासाठी 10.79 कोटी, रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यासाठी 51 लाख, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतंर्गत बस स्टॉप बांधण्यासाठी 12 लाख, गॅस कनेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी 5 लाख, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 2.25 कोटी, कृषि प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी 6 कोटी, वृक्ष लागवडीसाठी 3 कोटी, आरोग्य सुविधांसाठी 5.70 कोटी, शैक्षणिक सुविधांसाठी 3.70 कोटी, भक्तनिवासासाठी 2 कोटी, डिजिटल लायब्ररीसाठी 40 लाख तर शहरी सुविधा केंद्रासाठी 25 लाख रुपये आदि बाबींचा या प्रकल्प आराखडयात समावेश करण्यात आला आहे.

या आराखडयानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखून ही कामे वेळेत व दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करावेत असेही जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.आहे.

 

LEAVE A REPLY

*