Thursday, April 25, 2024
Homeजळगावजिल्हा परिषदेतील सत्तांतराच्या हालचालींना वेग

जिल्हा परिषदेतील सत्तांतराच्या हालचालींना वेग

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसच्या टेकूवर भाजपची सत्ता उभी असून अलीकडेच जिल्हा परिषदेतील राजकीय भेटीगाठीतून हालचाली गतिमान झाल्या आहेत.

- Advertisement -

आता 19 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेची वार्षिक सर्वसाधारण होणार असून या सभेत भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीची भूमिका काय असणार याविषयी चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा आयोजित घेण्यात आली होती. यात केवळ अर्थसंकल्पाशीच संबंधित चर्चा असल्याने अन्य सदस्यांना कोणताही विषय मांडता आले नव्हते.

जिल्हा परिषदेची सभा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून यापूर्वीच्या सभांमध्ये मोजकेच लोकप्रतिनिधी सभा हायजॅक करीत असल्याने इतर सदस्यांना बोलण्याची संधीच मिळत नसल्याने अन्य सदस्यांमध्ये या सभेबाबत स्पष्ट नाराजीचा सूर आहे. त्याकरिता एप्रिल महिन्यात सर्वसाधारण सभा होणार आहे.

जि.प. मध्ये एकूण 67 सदस्य संख्या असून सध्या भाजप 33, राष्ट्रवादी काँग्रेस 15, शिवसेना 13, काँग्रेस 4 असे एकूण पक्षीय बलाबल असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य अपात्र आहे.

मात्र,जळगाव महापालिका पाठोपाठ जिल्हा परिषदेत सत्तांतराच्या हालचाली सुरु असल्याने जिल्हयात राजकीय भूकंप कधी आणि केव्हा होणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेची 19 एप्रिल रोजी होणार्‍या सभेत भाजप विरुध्द महाविकास आघाडी असे समीकरण रंगण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या