वाकोद – वाघुर पुलावर अपघात: दाम्पत्य ठार

0

वाकोद, ता. जामनेर, । दि. 16 । वार्ताहर – जळगाव – औरंगाबाद महामार्गावरील वाकोद – फर्दापुर हद्दी ला जोडनार्‍या वाकोद वाघुर नदीच्या (आड नदीचा पुल) पुलावर शुक्रवार रोजी संध्या 7.30 वाजेच्या सुमारास अनोळखी वाहनाने मोटार सायकल क्र. एम.एच.19 ,7651 या वरून वाकोद कडून जाणार्‍या इम्रान खा सरताज खासाब (30) व त्यांची पत्नी अलिसा इम्रान खा (26) सह चार वर्षा ची मुलगी शिपा सोबत जाती होते तिघे राहनार तोंडापुर ता जामनेर येथील होते तर हल्ली मु. म्हणून जळगाव येथील मिल्लत नगर येथे राहत होते इम्रान हा जळगाव पाट बंधारे विभागात कर्मचारी होता सुट्टी च्या दिवशी तोंडापुर येथे येत ऐसे रस्त्यात वाघुर पुला वर अनोळखी वाहानाने चिरडल्याने यात पति पत्नी चा जागीच ठार झाले तर चार वर्षा ची चिमुरडी या भीषण अपघातात वाचली घटनास्थळी ही चिमुरडी रडत बसली होती घटने ची माहिती मिळताच फर्दापुर पोलिसानी घटनास्थळी येवून त्या मुलीला ताब्यात घेतले.

मुलींच्या प्रवेशासाठी गेले होते;- शुक्रवार ते रविवार सुट्टी मुळे इम्रान हा तोडापुर येथे जळगाव वरून येत होता तो आज जळगाव येथे आज त्याची मुलगी शिपा चे शाळेत प्रवेश घेवून तोंडापुर कडे निघाला होता रस्त्यातच काळाने त्याच्या वर घाला घातला व वाकोद वाघुर पुला वर वहानाने चिरडल्याने दुर्दैवी अंत झाला घटनेची माहिती मिळताच वाकोद फर्दापुर व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

रमजान साठी कपडे केले होते खरेदी – मुस्लिम समाजाचे पवित्र असे रमजान पर्व सुरु असून या साठी नवीन कपडे देखील खरेदी केल्याचे घटनास्थळी बैग मध्ये दिसून आले. वहानाने चिरडल्याने अक्षरश शरीराच्या काही भागचा छेंदामेंदा झालेला होता पहणार्याची भंबेरी उड़त होती

 

LEAVE A REPLY

*